पुण्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने संविधान दिन साजरा

पुण्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने संविधान दिन साजरा

पुणे : दि. २७. पुण्यातील ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २६ नाेव्हेंबर १९४९ राेजी संविधान लिहून पूर्ण करण्यात आले होते. व त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. २६ जानेवारी १९५० या दिवसापासून भारत हा नव्या संविधाना नुसार चालू लागल. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान हे जगभरातील देशासाठी प्रेरणादायक मानले गेले आहे. संविधान अमलात आणल्यापासून त्यात अनेक सुधारणा करण्यात झाल्या असून २६ नाेव्हेंबर हा दिवस दर वर्षी संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतात मोठ्या थाटात साजरा केला जातो. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे पुणे शहराचे कार्याध्यक्ष आशुतोष रविंद्र येरेल्लू यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारताच्या संविधानाचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, खडकी पोलीस स्टेशन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व इतर सरकारी कार्यालयात ससंविधाची प्रत देण्यात आली. यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.




