Uncategorized
पुण्यात रिक्षा चालकांना गणवेश घालणे अनिवार्य, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार
पुणे: दि. १६. पुण्यातील रिक्षा चालकांना गणवेश अनिवार्य करण्यात आला असून या नियायमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. या बाबत आरटीओ कडून पत्र काढण्यात आले आहे. रस्त्यावर सेवा देतांना किव्हा रिक्षा चालवितांना रिक्षा चालकांनी पांढरा शर्ट आणि खाकी पँट, असा गणवेश घालणे तसेच ओळखपत्र प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न केल्यास पुणे आर.टी.ओ. कडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान आता याबाबतच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याकरिता विशेष पथके तैनात केली जाणार आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा नियमभंग केल्याचे आढळल्यास मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार असल्याचे सदर पत्रात म्हंटले आहे.