खडकीतील दारुगोळा कारखान्यात हिंदी पंधरवडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा

खडकीतील दारुगोळा कारखान्यात हिंदी पंधरवडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा

पुणे : दि. ०९. खडकीतील येथील दारुगोळा कारखान्यात हिंदी पंधरवडा दिवस दि. १४/०९/२०२५ ते २९/०९/२०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात दारुगोळा कारखान्यातील अधिकरी व कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत भाग न घेता भारतातील राज्यभाषे बद्दलही उत्साह दाखविला आहे. दि. १४/०९/२०२५ ते २९/०९/२०२५ या दरम्यान दारुगोळा कारखान्यामध्ये निबंध स्पर्धा काव्यवाचन, हिंदी भाषेवरील ज्ञान, टंकलेखन इत्यादी हिंदी ज्ञानाबद्दल स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच रोजच्या कामकाजात व व्यवहारात हिंदी भाषेचा अधिक वापर करण्यात भर दिला गेला. त्यामुळे हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यावर भर देण्यात आला. दि. २९/०९/२०२५ रोजी हिंदी पंधरवडा दिवसाचा समारोपाच्या दिवशी स्पर्धेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी खडकीतील दारुगोळा कारखान्यातील महाव्यवस्थापक अरुण रा. ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हिंदीत काम करणाऱ्या दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोक रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. हिंदी पंधरवड्या दीना निमित्त त्यांनी हिंदी भाषेबद्दल बोलतांना म्हणाले कि हिंदी भाषा हि फक्त सरकारी कामकाजाची भाषा नाही. तर ती आपल्या संस्कृतीची वाहक आणि सहज संवादाचे माध्यम आहे. आपण केवळ राजभाषा म्हेणून नाही. तर ती आपल्या कामकाजाची भाषा म्हुणुन स्वीकारली पाहिजे. यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांचेही कौतुक केले. तसेच हिंदीतून माहिती देणारे महाव्यवस्थापक निशिथ द्विवेदी यांचाही रॉक रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे एक छोटे नाटक होते. या नाटकाने सर्वच भारावून गेले होते. या कार्यक्रमास दारुगोळा कारखान्यातील वरिष्ठ अधिकरी जे. सी. एम. तसेच तृतीय व चतुर्थ श्रेणी समितीचे पदाधिकारी , युनियन अन असोसिएनचे पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चार्जमन श्रीमती श्रद्धा पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मुबारक चाँद शेख यांनी केले.




