खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या वतीने वंदेमातरम गीत गायन स्पर्धा ०६ डिसेंबर २०२५, दु. १२:००

खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या वतीने गीत गायन स्पर्धा ०६ डिसेंबर २०२५, दु. १२:००
पुणे : दि. ०५. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणास्त्रोत ठरलेल्या, वंदेमातरम या राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण होत आहे. हे गीत प्रख्यात बंगाली कादंबरीकार बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले असून हे गीत भारताचे राष्ट्रीय गीत आहे. भारतीतील स्वातंत्र्य लढ्यात देशभक्तीचे हे एक शक्तिशाली प्रतीक बनले होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर, दि. २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने या गीताला भारता या देशाचे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृतपणे स्वीकारले गेले. या गीताला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ इतकाच समान दर्जा दिला गेला आहे. या वंदेमातरम या राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण होत असून खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या वतीने खडकी परिसरातील शाळा व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता वंदेमातरम या गीत गायन स्पर्धेचे आयोजन खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूल मधील ओपन ऑडिटोरियम खडकी पुणे – ३ या ठिकाणी शनिवार दि.०६ डिसेंबर २०२५ रोजी दु. १२:०० वाजाल्या पासून आयोजित केले आहे. तरी या वंदेमातरम दे गीत गायन हि स्पर्धा दोन गटांमध्ये विभाजन केली आहे यात समूह गायन व वैयक्तिक अशा प्रकारे हि स्पर्ध घेतली जाणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या वतीने पारितोषिक देण्यात येणार या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र (प्रशस्तीपत्रक) देण्यात येणार आहे, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू व संघटनेचे प्रांत अध्यक्ष विकास हांडे उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेत या स्पर्धेमध्ये जास्तीस जास्त विद्यार्थांनी सहभाग घ्यावा. असे आव्हान खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या प्रांत कार्याध्यक्ष राजेश शर्मा व खडकी विभाग अध्यक्ष शिरीष रोच यांनी केले आहे.तसेच खडकीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे मनोबल व धर्य वाढवावे, असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता संपर्क शिरीष रोच मो. क्रमांक ९८२२८१६४४१ यांच्याशी करावा

