शैक्षणिक

भारताच्या प्रगतीसाठी व आर्थिक विकासासाठी राष्ट्रीय शिक्षण आवश्यक – डॉ. मेधा कुलकर्णी

पुणे : दि. २४. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा शिक्षक आघाडीच्य वतीने भारताच्या आर्थिक प्रगती, संस्कृतीच्या जतन, राष्ट्रीय एकात्मता व शास्त्रीय प्रगतीकरिता भारत सरकारने घोषित केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) द्वारे भारतातील सर्वाना दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल व याचा फायदा पुढच्या दशकात युवा पिढीला होईल ,असे उदगार खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात काढले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे शिक्षक आघाडी ने आयोजित ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण – एक चर्चासत्र’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात एमआयटी (MIT) कॉलेज चे रजिस्ट्रार डॉ. रत्नदीप जोशी, रायसोनी महाविद्यालयाचे डॉ. हरीश कुलकर्णी यांनी भारतीय ज्ञान प्रणाली व राष्ट्रीय शिक्षण धोरण याविषयावर उत्तम माहिती उपस्थित शिक्षकांना दिली. तसेच पुण्यात लवकरच ब्राह्मण भवन उभारण्यात येईल व त्यात नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विशेष दालन उपलब्ध असेल असे उद्गार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे. या शुभ प्रसंगी ५० हून अधिक शिक्षकांना येवेळी नियुक्ती पत्रके देण्यात आली आहे. तसेच पुणे अध्यक्ष मंदार रेडे यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्षकांसाठी कौशल्य विकास व नवीन तंत्रज्ञानाची कार्यशाळा घेण्यात येईल असे म्हणाले. या कार्यक्रामात पुणे जिल्ह्यातील जेष्ठ सेवानिवृत्त, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी विश्वास नारायण कुलकर्णी (नाशिक) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या क्रायक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शिक्षक आघाडीचे पदाधिकारी राजेंद्र जोशी यांनी केले. तसेच या कर्यक्रमचे सूत्रसंचालन भाग्यश्री सुपनेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन हे शुभांगी दाऊतखाने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button