निगडी येथील स्मशानभूमीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनमानीवर प्रश्नचिन्ह
मयताच्या सामानाची बेकायदेशीर विक्री व लुटमारीचे आरोप

निगडी येथील स्मशानभूमीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मनमानीवर प्रश्नचिन्ह
मयताच्या सामानाची बेकायदेशीर विक्री व लुटमारीचे आरोप
पुणे : दि. २८. पिंपरी चिंचवड शहरातील निगडी अमरधाम स्मशानभूमींमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून शोकाकुल नागरिकांची लुटमार होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अंत्यसंस्काराच्या वेळी गैरफायदा घेत मयताच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मयतीचे सामान आमच्याकडूनच घ्यावे लागेल
तसेच अरेरावी करून सामान विक्री केली जात असल्याचे गंभीर आरोप नागरिकांनी केले आहेत. कायद्यानुसार मयताचे कोणतेही सामान विकण्याचा किंवा ताब्यात ठेवण्याचा अधिकार स्मशानभूमीतील कोणत्याही कर्मचाऱ्याला नाही. असे कृत्य थेट चोरी व विश्वासघाताच्या गुन्ह्यात मोडते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विरोध केल्यास काही कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे शोकाच्या वातावरणात कुटुंबीय गप्प बसण्यास भाग पडतात. हा प्रकार थांबवण्यासाठी महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा गैरप्रकारांमध्ये दोषी आढळलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच कंत्राट रद्द करण्याचा अधिकारही वापरण्यात येईल.
स्मशानभूमी ही संवेदनशील जागा असून, तेथे मानवतेचा आणि नियमांचा सन्मान राखला गेला पाहिजे. अन्यथा नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.



