Uncategorized

दापोडी पोलीस स्टेशनचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते

पुणे : दि. २६. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या दापोडी येथील पोलीस स्टेशनचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. दापोडी येथील पोलीस स्टेशनची नवीन इमारती ही वैशिष्ट्ये पूर्ण व आत्याधुनिक सोयी सुविधांनी बांधन्यात आली आहे. व या इमारती समोर उद्यान असून या परिसर मोठे मैदान आहे. तसेच या इमारती मध्ये प्रशस्त डे बुक खोली, मुद्देमाल खोली, क्लार्क, तपास पथक, पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वातंत्र्य विश्रांती कक्ष, बाल स्नेही कक्ष आणि हिरकणी कक्ष बांधन्यात आले आहे. या पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष, आमदार अण्णा बनसोडे, अमित गोरखे, मा. आमदार विलास लांडे, महापालिका आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त सचिन हिरे, दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक राजू भास्कर, पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस निरीक्षक वंदना ठोक, व इत्यादी पोलीस कर्मचारी ,संजय काटे, योगेश बहल, नाना काटे, प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, राजू बनसोडे, रोहित काटे, चंद्रकांता सोनकांबळे, माई काटे यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button