Uncategorized

बोपोडीत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आनंद सोहळा

पुणे ; दि. १०. बोपोडीत प्रभाग ८ येथील जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आनंद सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक सप्ताह निमित्ताने जेष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवा निमित्त ज्येष्ठांचा सन्मान, आरोग्य आणि आनंद यांचा संगम घडवणारा आगळा वेगळा कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिका, समाज विकास विभाग परिमंडळ क्र. २, औंध-बाणेर कार्यालय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जेष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवा दीनानिमित्त टि.जे. महाविद्यालय खडकीचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.प्रकाश पांढरमिसे यांचे जेष्ठ नागरिकांसाठी “आनंदी जीवन जगावे कसे”? या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. जेष्ठ नागरिक यांच्यासाठी आनंदी जीवन जगण्याची उदाहरणे देत आरोग्य, व्यायाम, ध्यान धारणा याविषयी संवाद साधला. तसेच समूहसंघटिकांनी ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम रंगतदार पद्धतीने सादर केले. विद्या गुंडाळ समुपदेशक यांनी बदलत्या कुटुंब व्यवस्थेचा परिणाम, स्त्री संसाधन केंद्राची माहिती व “पालक व ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा २००७” याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठ नागरिकांची करमणूक विभागात स्मरणशक्ती खेळ, संगीत खुर्ची, टोपी बदल, फुगे फुगवणे अशा खेळांनी ज्येष्ठांना बालपणाचा आनंद दिला. यासोबतच बीपी-शुगर तपासणी, मोफत फिजिओथेरपी, आयुष्यमान व आभा कार्ड नोंदणी तसेच श्रावणबाळ योजनेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमातील एकूण १०३ ज्येष्ठ नागरिकांना छोटेखानी भेटवस्तू, चॉकलेट व अल्पोपहार देण्यात आला. डॉ. विकास यांनी मानसिक व शारीरिक आरोग्याचे महत्त्व पटवून दिले, समारंभाचे अध्यक्षस्थानी मनोगत व्यक्त करताना मुरकुटे म्हणाले की, जगणं क्षणभंगुर आहे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या . आपले आरोग्याची काळजी घ्या आणि सदैव हसत रहा कारण हसण्यासारखा दुसरा व्यायाम जगात कुठेच नाही. याप्रसंगी वृद्धमित्र संघांचे दिलराज सूद, डॉ. विकास फिजिओथेरपी तज्ज्ञ, पल्लवी जोगदंड सीफार संस्था व श्री. मोहन महाले, सौ स्वाती जाधव, क्रांती जाधव, वैशाली फुलसुंदर व ज्योती भिंगारे, सुनील रकटे, सुभाष गजरमल, बबन दळवी, कृष्णकुमारी धिमान,शांताबाई ढोरे,रत्ना बांगर सिंधू ठोंबरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टि. जे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे सर यांनी केले त्यांनी जेष्टांसाठी सुंदर कवितांचे सादरीकरण केले वैशाली फुलसुंदर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button