खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड – पुणे मनपा विलीनीकरणा संदर्भात खुले चर्चासत्र, स्थळ – लालबहादूर शास्त्री हायस्कूल खडकी

पुणे : दि. १४. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड – पुणे महानगर पालिकेत विलीनीकरण संदर्भात खडकीतील नागरिकांच्यासाठी खुले चर्चा सत्राचे आयोजन खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता करण्यात येणार आहे यासाठी वंदेमातरम संघटनेने खडकीकरांना विनम्र आवाहन केले आहे. देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना जवळच्या महानगरपालिका, नगरपालिका अथवा नगरपरिषदांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुणे मनपात विलीनिकरण करण्याच्या प्रक्रियेस गेल्या सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली होती. व तसा शासनाकडून जीआर देखील काढला गेला होता. पण विलीनीकरण आज होईल की, उद्या ? या विचाराने खडकीतील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहे. व येत्या काही दिवसांत होणाऱ्या मनपाच्या निवडणुकीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाते की काय? या विचाराने आडाखे कार्यकर्ते बांधू लागले आहे. तसेच पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यास तेथील फायदे- तोटे यावर देखील चर्चा रंगू लागल्या आहे. कोणाच्या मनात आनंद तर कोणाच्या मनात उद्भवणाऱ्या विविध विचार, शंका- कुशंका यामुळे येथील नागरिकांच्या मनात गोंधळ माजू लागला आहे. जशा पुणे महानगर पालिका निवडणूक जाहीर झाल्याने खडकीचा विचारच केला नसल्याने तसेच बोर्डाच्या निवडणुकाही होत नसल्याने कार्यकर्ते ‘तळ्यात की मळ्यात’? अशी अवस्था झाली आहे. दुसरीकडे गेल्या काही वर्षापासून बोर्डाच्या निवडणुकाच नसल्याने लष्करी अधिकारी (अध्यक्ष), बोर्डाचे अधिकारी तसेच नागरिकांच्या वतीने केवळ एका नामनिर्देशित सदस्यावर (उपाधयक्ष) बोर्डाचा कारभार चालवत आहे. यामुळे निर्णय प्रक्रियेतमध्ये मर्यादा येत आहेत. थोडक्यात ‘आई जेवू घाली ना’ व बापाने अजून पालकत्वच स्विकारेना अशी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांची अवस्था असल्यासारखी झाली आहे.
एखाद्या कंपनीचा मालक जेव्हा बदलतो, तेव्हा तेथील कामगारांना देखील प्रशासन अथवा मालकाच्या वतीने माहिती दिली जाते, त्यांना विश्वासात घेऊन नव्या मालकाची कल्पना दिली जाते. परंतु या ठिकाणी जवळपास दोन शतकापासून वसलेल्या खडकीतील नागरिकांना विलीनीकरणा बाबद कोणतीही कल्पना न देता सरकारने परस्पर हा निर्णय घेतल्याचं खडकीकरांचे मत आहे. खरे तर विलीनीकरणासंदर्भात बोर्डाच्या हद्दीतील रहिवाशांना प्रशासनातर्फे कल्पना देऊन त्यांच्या प्रतिक्रिया मागवणे आवश्यक होते. परंतु बोर्डातील अधिकाऱ्यांच्या खुर्चीला यामुळे कुठलाही धक्का पोहोचत नसल्याने तशी तसदी घेतली नसावी.असाही सवाल नागरिकांकडून बोलले जात आहे.
अनेक वर्षापासून खडकी राहणाऱ्या नागरिकांना पुणे महानगर पालिकेत विलीणीकरणाच्या फायद्या तोट्याच्या बाबद अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बोर्डाच्या एफएसआय संदर्भात, झोपडपट्ट्यांसंदर्भात, जुन्या इमारती- ओल्ड ग्रांट- प्रॉपर्टी टॅक्स- शाळा- हॉस्पिटल- उद्याने – पथारीवाले -बांधकाम किव्हा दुकानदारांचे प्रश्न असोत. या सर्व खडकीकरांच्या प्रश्नांना मोकळी वाट करून देण्यासाठी खडकीतील वंदेमातरम संघटनेच्या वतीने शिवाजीनगर मतदार संघटित स्थानिक आमदार मा. सिद्धार्थदादा शिरोळे, नामनिर्देशित सदस्य अभयजी सावंत, बोर्डाचे व पुणे पालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबर खडकीतील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या ओपन ऑर्डिटोरिअम खडकी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्याठी आपल्या मनात असणारे प्रश्न मांडता येथील. असे आव्हान खडकीकरांना वंदेमातरम संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.




