खेळ

खेलो इंडिया खेलो स्पर्धेमध्ये किक बॉक्सिंग मध्ये पुन्हा महाराष्ट्राचा डंका

खेलो इंडिया खेलो स्पर्धेमध्ये किक बॉक्सिंग मध्ये पुन्हा महाराष्ट्राचा डंका

पुणे : दि. ३१. “खेलो इंडिया खेलो” अस्मिता वुमन्स किती बॉक्सिंग लीग ही स्पर्धा चे दिनांक २५ ते२८ डिसेंबर या रोजी इंदोर, मध्य प्रदेश येथे झोनल लेवल किकबॉक्सिंग लीग स्पर्धेच आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राज्यस्थान, तेलंगणा, गोवा, दिव दमन, दादर नगर हवेली, मध्य प्रदेश या राज्यांनी सहभाग घेतला होता, तसेच या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ८४ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी इतिहास नोंदवत या स्पर्धेत एकूण ५१ पदक प्राप्त केले त्यात २० सुवर्ण पदक, १७ रजत पदक, १४ कास्य पदकाची कमाई केली. तसेच कळंबोली येथील रायगड किकबॉक्सिंग असोसिएशन च्या वतीने आपल्या कळंबोली येथील इंडियन मार्शल आर्ट स्पोर्ट्स असोसिएशन च्या सानिका ठाकुर, उमंग तांडेल, श्रुतिका पारते सुवर्णपदक, मेनका मयुरा, सारंगी गोले ( रजत पदक ) जिया ठाकूर, दिपाली वाकचरे (कांस्य पदक), दिव्या पाटील, रिताशा सुर्वे, ऋतुजा माळी, मृदुला पाटील सहभाग पात्र ठरल्यामुळे रायगड नगरीमध्ये त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे, महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार सर, सचिव धीरज वाघमारे, सहसचिव विशाल सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. त्यामुळे किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या रायगड च्या वतीने सर्वांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे कोच ज्यांनी आपल्या जीवाचे रान करून आपल्या खेळाडूंना विजय मिळून देण्यासाठी ज्यांचा खारीचा वाटा आहे असे आपले कोच दीपा गावळे मॅडम, ओमकार राठोड, राम सोनूने,विघ्नेश मुरकर, शुभम सरोज, वरद सुपरकार, केदार म्हात्रे, श्रवण ठाकूर,दिया गायकवाड, मॅडम व या सर्व सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आहे. यावेळी महाराष्ट्राने पुन्हा एकदा पहिल्या नंबरचा मान कायम राखल्यामुळे किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या रायगड यांच्यावतीने दीपेश सोलंकी, शैलेश ठाकुर, संतोष मोकळ, बंडू पाटील, अक्षय जाधव तसेच पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, साप्ताहिक आवाज कोकणचे संपादक डॉ. वैभव पाटील, दै. महाराष्ट्र जीतचे पत्रकार अविनाश जाधव (कळंबोली पनवेल) या सर्वांकडून खुप खुप अभिनंदन तसेच मेडलिस्ट मुलींचे चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे सर्वांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button