पिंपरीत प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

पिंपरीत प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
पुणे : दि. ०३. पिंपरी येथील बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टच्या वतीने नूतन अध्यक्ष ॲड. बी. के. कांबळे यांचे नेतृत्वाखाली भारतीय प्रजासत्ताक दिन साजरी करण्यात आला. यावेळी खजिनदार कमलेश जैन, सदस्य विजय ढवळे ,सदस्य गोरख खळगे, सचिव प्रवीण कांबळे ,सदस्य संजय साळवे यांच्या सह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अँड बी के कांबळे यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. यावेळी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामुदायिक बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील धम्मपालन गाथा शरणतेय घेण्यात आले. यावेळी बी के कांबळे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट नूतन अध्यक्ष अँड बी के कांबळे यांच्या नेतृत्वाखाली बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्ट नूतन खजिनदार कमलेशजी मुलतानमल पोरवाल यांची नियुक्ती करण्यात आली .कमलेश मुलतानमल पोरवाल यांचे सर्व धर्मीय प्रति असणारे सामाजिक कार्य विचारात घेता व कोरोना कोविड-19 काळामध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पीडित व अडचणीत असलेल्या अनेक कुटुंबांना दोन वेळचे जेवण कशा पद्धतीने देता येईल याविषयी सातत्याने फार मोठा प्रयत्न केलेला आहे .याचेच फलित म्हणून अँड बी के कांबळे यांनी त्यांची बहुजन प्रेरणा बुद्ध सामाजिक ट्रस्टपदी नियुक्ती केली आहे, व ट्रस्ट वाढीसाठी पुढील कार्यकाळामध्ये त्यांच्याकडून फार मोठ्या योगदानाची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून त्यांना खजिनदार पदी नेमणूक झाल्याने ट्रस्ट सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळी शुभेच्छा देताना सदस्य विजय ढवळे, गोरख खळगे संजय साळवे, सचिव प्रवीण कांबळे व कमलेश मुलतानमल पोरवाल उपस्थित होते.




